डिझायनर आणि अंगात घट्ट बसेल असा (स्लिम फिट) बुरखा घातल्यामुळे पाहणाऱ्याचे लक्ष वेधले जात असल्याने अशा प्रकारचा बुरखा घालणे हे इस्लामविरोधी आहे, असे इस्लामी विचारसरणीची प्रख्यात पाठशाळा असलेल्या दारुल उलूम देवबंदने जारी केलेल्या फतव्यात म्हटले आहे.निरनिराळे प्रकार, रंग आणि डिझाइन्स यातील बुरख्यांना इस्लाममध्ये परवानगी नसल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘हिजाब’ च्या (बुरखा) नावावर डिझायनर व स्लिम फिट बुरखा वापरणे निषिद्ध असून इस्लाममध्ये त्याला संपूर्ण मनाई आहे, असे या फतव्यात नमूद केले आहे.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews